नवी मुंबईत तरुणीला लुटून धावत्या रेल्वेतून बाहेर फेकलं

नवी मुंबईत तरुणीला लुटून धावत्या रेल्वेतून बाहेर फेकलं

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबईत तरुणीला लुटून रेल्वेतून फेकून देण्यात आलंय. नेरूळ – जुईनगर स्थानकादरम्यान ही धक्कादायक घटना घडलीये.

ऋतूजा बोडके असं या तरुणीचं नाव आहे. जुईनगरमध्ये राहणारी ऋतूजा सिवूडमध्ये रेल्वेच्या महिला डब्यात चढली. रात्री उशिरा ती प्रवास करत असल्यानं डब्यात एकटीच होती.

नेरूळ रेल्वे स्थानकावर एक तरुण त्या डब्यात चढला आणि त्यानं तिचा मोबाईल, पर्स हिसकावून घेतली. तिनं विरोध करण्याता प्रयत्न केला असता, त्यानं तिला धक्का दिला आणि रेल्वेतून बाहेर फेकलं.

यात तिच्या डोक्याला दुखापत झालीये. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करताहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version