मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईत झाली. या सभेत मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. आकाश, अनंत आणि ईशा अंबानी यांचा समावेश रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर झाला आहे. नीता अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळातून पायउतार झाल्या आहेत. रिलायन्स कंपनीची जिओ एअर फायबर सेवा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुरू होत आहे. ब्रॉडबँड सेवेद्वारे जिओ स्मार्ट होम सेवा देण्यावर जिओचा भर असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
Welcome to the 46th Annual General Meeting of Reliance Industries Limited (Post IPO) https://t.co/kjZbMzKOnJ — Reliance Industries Limited (@RIL_Updates) August 28, 2023
जिओ थ्रू ५ जी लॅब सुरू करत असल्याचे रिलायन्सने वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केले आहे. सध्या जिओ फायबरचे एक कोटीपेक्षा जास्त ग्राहक आहेत. आता जिओ एअर फायबर सेवा सुरू करून कंपनी ग्राहक संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ग्राहक संख्या २० कोटींपेक्षा जास्त व्हावी यासाठी कंपनी प्रयत्न करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२३ या आर्थिक वर्षात २.६ लाख नोकऱ्या दिल्या. जिओद्वारे मासिक इंटरनेट वापर हा ११०० कोटी जीबीच्या घरात पोहोचल्याचे वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक युझर दरमहा २५ जीबी डेटा वापरत आहे. जिओमुळे इंटरनेटवरील ट्रॅफिक ४५ टक्क्यांनी वाढला आहे. भारतातील ९६ टक्के शहरांमध्ये जिओची ५ जी सेवा उपलब्ध आहे. जिओच्या सबस्क्रायबरची संख्या ४५ कोटींपेक्षा जास्त झाली आहे, अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजने दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.