भरधाव वेगात असलेल्या जीपने पुलाखाली घेतला पेट अन्

भरधाव वेगात असलेल्या जीपने पुलाखाली घेतला पेट अन्

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पूर्व द्रुतगती मार्गावर ऐरोली उड्डाण पुलाखाली भरधाव वेगात असलेल्या जीपने अचानक पेट घेतल्याची घटना घडलीय. दरम्यान, जीपचा चालक आणि प्रवासी महिला प्रसंगावधान राखून वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळलाय. ऐरोली पुलाखाली गाडी येताच गाडीच्या इंजिनमधून आग येऊ लागली.

यावेळी आजूबाजूच्या लोकांनी ही गोष्ट गाडी चालकाच्या लक्षात आणून देत गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही क्षणाताच गाडीने भीषण पेट घेतला. पण त्याचवेळी चालक आणि त्याच्या सोबत असलेल्या प्रवासी महिलेने गाडीतून उडी घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग अटोक्यात आणली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version