पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; जम्मूत पुन्हा गोळीबार

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; जम्मूत पुन्हा गोळीबार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून शुक्रवारी पाकिस्तानच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सांबा, अरनिया, कठुआ, आर एस पुरा सेक्टर येथील भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांना पाकने लक्ष्य केले आहे. भारतीय जवानांनीसुद्धा पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

गुरुवारी रात्रीपासून सीमा रेषेवर गोळीबार सुरु असल्याने सीमेलगतच्या गावात भीतीचे वातावरण पसरलए आहे. सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्सने गुरुवारी रात्री पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून अत्याधुनिक शस्त्रांद्वारे गोळीबार करत होतं. त्यावेळी भारतानेही पाकिस्तानच्या काही चौक्या आणि बंकर नेस्तनाबूत केल्या. पाकिस्तानला ज्याप्रकारे भारताने प्रत्युत्तर दिले, त्यावरुन एक संदेश दिला गेला की, सीमेपलीकडून गोळी आल्यास, त्याचे उत्तरही गोळीनेच दिले जाईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version