जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावल्यानंतर देसी गर्ल प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये नशिब आजमवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात ती पूर्णपणे यशस्वी देखील झाली. मात्र,आंतरराष्टीय कलाकार झाल्यामुळे प्रियांकाचा भाव चांगलाच वधारला आहे. ज्या बॉलिवूडमध्ये इतर कलाकार कोटींमध्ये एखादा सिनेमा साईन करतात, त्या ठिकाणी प्रियांका अवॉर्ड शोमध्ये एका मिनिटाला कोटींची घरात मागणी करतेय.
येत्या 19 डिसेंबरला झी सिने अॅवॉर्डमधील लाईव्ह परफॉर्मन्ससाठी ती इतकी मोठी फी आकारणार आहे. या शोमध्ये 5 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी प्रियांका मिनिटाला 1 कोटी याप्रमाणे पैसे घेणार आहे. तिने 4 ते 5 कोटी रुपयांची मागणी आयोजकांकडे केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रियाकांच्या या मागणीमुळे आयोजकांनी एक पाऊल मागे घेतलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.