पंजाबच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा पहिला पराभव झाला आहे. 28 एप्रिल रोजी पार पडलेल्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे पंजाबला फलंदाजीचा मान मिळाला. यावेळी पंजाबने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 223 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पूर्ण करत राजस्थानने 228 धावा करत बाजी मारली. तर पंजाबला आयपीएल 2026 मधील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.
यावेळी प्रथम फलंदाजी करत प्रभसिमरन सिंह याने 59 धावांची खेळी खेळली. तर पंजाबकडून मार्कस स्टोयनिस याने सर्वाधिक 62 धावा केल्या. तसेच कूपर कोनोली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी भागीदारी करत 60 धावांचे योगदान दिले. प्रियांश आर्या याने 29 धावा जोडल्या. दुसरीकडे गोलंदाजांमध्ये यश राज पुंजाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या तर जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. अशा प्रकारे पंजाबला राजस्थान समोर 223 धावांचा डोंगर उभारता आला.
पंजाबला प्रत्युत्तर म्हणून राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने 51 धावा, वैभव सूर्यवंशीने 43 धावा आणि ध्रुव दुरेलने 16 तर रियान परागने 29 धावांचे योगदान दिले. यावेळी जैस्वालने 1 षटकार आणि 7 चौकार आणि वैभवने 5 षटकार आणि 3 चौकार लगावत पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. मात्र डोनोवन फेरेरा आणि शुभम दुबे या दोघांच्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्स पंजाब किंग्सचा विजयरथ रोखण्यात यशस्वी ठरले.
दोघांनी 32 बॉलमध्ये 77 धावांची धुव्वाधार खेळा खेळली. डोनोवनने नाबाद 52 धावा केल्या तर शुबमने 31 रन्सची खेळी केली. तर गोलंदाजांमध्ये चहलने 3 विकेट्स आणि अर्शदीप सिंह 1 विकेट मिळवली. यासह राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. तर पंजाबला या मोसमात 8 व्या सामन्यानंतर पहिल्या पराभवाची चव चाखावी लागली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.