आयपीएलचे सामने व्यावसायिक कार्यक्रम की निव्वळ क्रीडाप्रकार? भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे BCCI ला आदेश

आयपीएलचे सामने व्यावसायिक कार्यक्रम की निव्वळ क्रीडाप्रकार? भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे BCCI ला आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आयपीएलचे सामने हा व्यावसायीक कार्यक्रम आहे की निव्वळ क्रीडाप्रकार आहे हे स्पष्ट करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने बीसीसीआयला दिले आहेत.

 

तसेच भविष्यात पुन्हा दुष्काळ परिस्थिती आली तर मुंबई महापालिकेकडून पाणी घेणार नाही अशी ग्वाहीसुद्धा बीसीसीआय आणि एमसीएने कोर्टाला दिली आहे.

 

आयपीएल हा व्यावसायीक कार्यक्रम आहे की निव्वळ खेळ आहे अशी विचारणा कोर्टाने केली. त्यावेळी एमसीएनं क्रिकेटच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा, टेस्ट मॅचेस निव्वळ खेळ प्रकार आहे असं सांगितलं होते.

 

तसेच आयपीएल आयोजकांकडून मनोरंजन करही राज्य सरकारला मिळत असतो, त्यामुळे त्याला निव्वळ खेळप्रकार म्हणता येणार नाही अशी माहिती कोर्टाला देण्यात

आली.

 

त्यामुळे याबद्दल नेमकी भूमिका स्पष्ट करण्यास बीसीसीआयला कोर्टानं सांगितले आहे. तसेच मुंबई हायकोर्टानं ज्या ठिकाणी आयपीएल सामने होतात तिथल्या

महापालिकांना भविष्यात दुष्काळ आल्यास त्यावेळेस आपली भूमिका काय असणार हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता 14 ऑगस्टला

होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version