IndiGo Flight Cancelled : इंडिगोने केल्या अनेक ठिकाणच्या विमानसेवा बंद; पुणेकरांवर होणार ‘हा’ परिणाम

इंडिगोने हिवाळी हंगामात विविध कारणांमुळे अनेक ठिकाणच्या विमानसेवा बंद केल्याचा परिणाम पुणेकरांवरही होणार असून, पुणे ते बँकॉक विमानसेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.
IndiGo Flight Cancelled : इंडिगोने केल्या अनेक ठिकाणच्या विमानसेवा बंद; पुणेकरांवर होणार ‘हा’ परिणाम

इंडिगोने हिवाळी हंगामात विविध कारणांमुळे अनेक ठिकाणच्या विमानसेवा बंद केल्याचा परिणाम पुणेकरांवरही होणार असून, पुणे ते बँकॉक विमानसेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणे बँकॉक प्रवासासाठी नागरिकांना एअर इंडियाच्या सेवेचा वापर करावा लागणार आहे.

हेही वाचा- Palghar News : पालघरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; थेट अमेरिकेच्या नागरिकांना गंडा घातला
इंडिगोकडून सध्या विविध व्यावसायिक सेवांचा आढावा घेतला जात आहे आणि प्रक्रियेचा भाग म्हणून अनेक मार्गांवरील सेवा रद्द करण्यात येत आहेत. पुणे बँकॉक या मार्गावर इंडिगोला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा मार्ग आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नव्हता. पर्यायाने इंडिगोला 29 मार्चपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी हंगामासाठी ही सेवा बंद करावी लागत आहे. एकीकडे पुणे विमानतळावरून नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची, विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे शिवाय काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या नव्या नवीन टर्मिनलमुळे आंतरराष्ट्रीय सेवांची संख्या वाढेल अशी अपेक्षा होती मात्र आपल्या प्रवाशांच्या प्रतिसादामुळे चालू असलेली बँकॉकची आंतरराष्ट्रीय सेवाही बंद पडणे हा पुणे विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version