Palghar Crime : आधी प्रियकरासोबत फिरायला गेली, दोन दिवसांनी मृत्यू; पालघरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय झालं?

पालघरमध्ये प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा दोन दिवसांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Palghar Crime : आधी प्रियकरासोबत फिरायला गेली, दोन दिवसांनी मृत्यू; पालघरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय झालं?

पालघरमध्ये प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा दोन दिवसांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंजू विष्णू कडू असे मृत मुलीचे नाव असून अंजूची अचानक प्रकृती खालावली होती. अंजूचा मृत्यू घातपातामुळे झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला असून, तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

हेही वाचा- NEET Student Death : विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे सत्र थांबेना! कोटामध्ये भाड्याच्या घरात आढळला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह; कोचिंगमध्ये करत होती NEET ची तयारी

अंजूची प्रकृती खालावल्यानंतर तिला रुग्णालयात न नेता तिच्या वर्ती येशूची प्रार्थना करण्यात वेळ घालवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, मुलगी कुठे गेली होती, तिच्यासोबत नेमकं काय घडलं आणि उपचार करण्यात झालेल्या कथित विलंबाचा मृत्यूशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे.

शवविच्छेदनातील नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी दिली आहे. पोलिस तपासातून अंजूच्या मृत्यूमागचे नेमके कारण आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी स्पष्ट होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version