राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून शालेय पोषण आहाराची तपासणी सुरू असतानाच वाशिम जिल्ह्यातही कारवाईच्या धास्तीने अनेक ठिकाणी शालेय पोषण पदार्थ असेल किंवा इतर मुदतबाह्य झालेले खाद्य पदार्थ उघड्यावर फेकून देण्यात असल्याचा प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे ,अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने हे खाद्य पदार्थ उघड्यावर टाकून देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त मुंडेंच्या आदेशाला अहिल्यानगरमध्ये केराची टोपली?
एकीकडे राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफे आणि विविध खाद्य आस्थापनांवर सातत्याने धाडी टाकून भेसळखोरांचे दाबे दणाणले आहेत. तर दुसरीकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त मुंडेंच्या आदेशाला अहिल्यानगरमध्ये केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूड विक्री, मोफत वाटप आणि जाहिरातींवर एफडीएने पूर्णपणे बंदी घातली आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. अहिल्यानगर शहरातील प्रमुख शाळांबाहेर आजही जंक फूड, चाट सेंटर आणि तळलेल्या पदार्थांच्या गाड्या सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विभागाचे अधिकारीच या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आता अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासन विभाग यावर ठोस कारवाई करणार की ही बंदी केवळ कागदावरच राहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.