Gondia : गोंदिया हादरलं! मासे पकडण्यासाठी तलावात उतरलेल्या 9 वर्षीय मुलाने गमावला जीव; तर मूर्ती विसर्जनावेळी जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू

Gondia : गोंदिया हादरलं! मासे पकडण्यासाठी तलावात उतरलेल्या 9 वर्षीय मुलाने गमावला जीव; तर मूर्ती विसर्जनावेळी जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू

गोंदिया : मित्रांसोबत तलाव परिसरात खेळण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय बालकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील निलज येथे घडली. जयेंद्र भुमेंद्र चौधरी (वय 9 वर्षे) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. काल गावातील मुले खेळण्यासाठी गावाजवळ असलेल्या कानाबोडी तलाव परिसरात गेले होते. जयेंद्र हा देखील त्याच्या मित्रांसह तलाव परिसरात गेला होता. दरम्यान त्याच्यासह असलेले त्याचे मित्र तलावात मासे पकडत होते. जयेंद्रला सुद्धा मासे पकडण्याचा मोह आवरला नाही. तो तलावात मासे पकडण्यासाठी उतरला. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून खोल पाण्यात बुडाला. त्याच्यासह असलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरड केली. तसेच गावात जाऊन या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी तलावात शोध मोहीम राबविली. मात्र जयेंद्रला वाचविण्यात त्यांना यश आले नाही. जयेंद्रचा मृतदेहच हाती लागला.

हेही वाचा : Nana Patole : 'लाडक्या बहिणींना बेईमान भावांनी फसविले’; आमदार नाना पटोलेंचा सरकारवर हल्ला

तर दुसरीकडे श्रीकृष्ण मूर्ती विसर्जनादरम्यान तिरोडा तालुक्यातील बेरडीपार येथे भारतीय सैन्य दलातील एका जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुट्टीसाठी गावी आलेल्या जवानाचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरावर आणि बेरडीपार गावावर शोककळा पसरली आहे. कार्तिक गौतम (वय 34) असे मृतक जवानाचे नाव आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला हा जवान काही दिवसांपूर्वीच सुट्टी काढून आपल्या बेरडीपार या मूळ गावी आला होता. गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी व त्यानंतरच्या उत्सवाचा उत्साह असताना मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत तो आनंदाने सहभागी झाला होता. विसर्जनादरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version