Jalgaon Accident : जळगावात विचित्र अपघात! टँकरच्या धडकेनंतर दुचाकीवरील तिघे चाकाखाली; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी  

जळगावमध्ये एक विचित्र आणि भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शहरातील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या तीन आयटीआय विद्यार्थ्यांना टँकरने जोरदार धडक दिली.
Jalgaon Accident : जळगावात विचित्र अपघात! टँकरच्या धडकेनंतर दुचाकीवरील तिघे चाकाखाली; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी  

जळगावमध्ये एक विचित्र आणि भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शहरातील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या तीन आयटीआय विद्यार्थ्यांना टँकरने जोरदार धडक दिली. धडकेनंतर तिन्ही विद्यार्थी थेट टँकरखाली आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी विचित्र अपघात झाला.

विरुद्ध दिशेने अचानक बोलेरो वाहन आल्याने घाबरलेल्या दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचे नियंत्रण सुटून ते टँकरखाली आले. या अपघातात एका आयटीआय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यात वरुण विजय सुरवाडे याचा मृत्यू झाला, तर पवन अनिल अडकमोल हा गंभीर जखमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- Dahisar Road Accident : भीषण अपघात! सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्यानं गमावला जीव; शाळेतून वडिलांसोबत घरी परतत असताना काळाचा घाला

नीरज रवींद्र कोचुरे हा किरकोळ जखमी झाला आहे. तिघेही जळगाव येथील शासकीय आयटीआयचे विद्यार्थी असून कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीने भुसावळकडे जात होते. अपघातानंतर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून वरुणला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, रुग्णालयात नातेवाईक व मित्रांनी मोठा आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या भीषण अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, टँकर चालकाबाबतही माहिती घेतली जात आहे. या घटनेने विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version