नव्या संकल्पनेचा नवा सामूहिक विवाह सोहळा

नव्या संकल्पनेचा नवा सामूहिक विवाह सोहळा
जय महाराष्ट्र न्यूज, लातुर
अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत लातुर मध्ये धर्मादाय सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे. या विवाह सोहळ्यात 54 जोडपी विवाह बद्ध झाले.
लातुरच्या ग्रामदैवत सीधेश्वर मंदिर येथे या विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू, मुस्लीम, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मीय पद्धतीने हे विवाह झाले धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून सर्व धर्मातील एकूण 54 जोडपी या सोहळ्यात विवाह बद्ध झाले आहेत.
असे विवाह होणे गरजेचे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या खांद्यावरील भार हलका होईल आणि लग्नासाठी कर्ज काढण्याचा पाईंडा बंद होईल असं मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलयं तर आशा सामूहिक विवाह सोहळ्यासाठी नाम फाउंडेशन कडून एक लाख रुपये प्रत्येक जिल्ह्याला देत असल्याचे मकरंद अनासपुरे यांनी यावेळी सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version