Amravati News : मेळघाटातील शाळेमध्ये भूतबाधेची अफवा, 600 विद्यार्थ्यांनींनी थेट शाळाच सोडली; ‘अंनिस’च्या सदस्यांनी साधला गावकऱ्यांशी संवाद

Amravati News : मेळघाटातील शाळेमध्ये भूतबाधेची अफवा, 600 विद्यार्थ्यांनींनी थेट शाळाच सोडली; ‘अंनिस’च्या सदस्यांनी साधला गावकऱ्यांशी संवाद

सुरेंद्र अरोडे, प्रतिनिधी 

अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटात चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील आदिवासी शासकीय आश्रम शाळेत मुलींना भूतबाधा झाल्याच्या अफवेने मुलींनी शाळा सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. सात ते आठ दिवसांपूर्वी डोमा येथील आदिवासी आश्रम शाळेतील 15-16 विद्यार्थिनी अचानक हसायला लागल्या, रडायला लागल्या, काहींना घुंगरूचे आवाज यायला लागले, ही बाब वस्तीगृहाच्या अधीक्षिका यांच्या लक्षात येतात त्यांनी मुख्याध्यापकांच्या लक्षात आणून दिली. मात्र दुसऱ्या दिवशी गावात मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे जवळपास 600 च्या वर मुली वस्तीगृह सोडून आपापल्या गावी निघून गेल्या. 

www.jaimaharashtranews.com/crime/ankit-who-was-injured-in-a-pitbull-attack-that-is-going-viral-on-social-media-recounts-his-ordeal/58446

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत आरोग्य विभागाचे पथक देखील दाखल झाले असून त्यांनी ही भूतबाधा नसून हिस्टरीया हा मानसिक आजाराचा प्रकार असल्याचा सांगितलं. सर्व विद्यार्थिनीशी आणि पालकांशी त्यांचं कौन्सिलिंग सुरू असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितलेला आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नंदिनी जाधव, डॉक्टर देशमुख देखील मुंबईवरून या ठिकाणी येऊन मुलींचे, गावकऱ्यांचे समुपदेशन केले. मुलींना त्यांचं समुपदेशन करून शाळेत परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे माहिती मुख्याध्यापक चौधरी यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version