रायगड : रायगडमध्ये महाड तालुक्यातील रुपवली सुंभेकोंड येथे पोटच्या मुलानेच आपल्या आईवर भाजी कापण्याच्या सुरीने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र मोतीराम सुंभे असे (वय 24 ) आरोपीचे नाव असून विमल मोतीराम सुंभे असे जखमी आईचे नाव आहे. याप्रकरणी महाड MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी राजेंद्र सुंभे याला अटक केली आहे. विमल सुंभे हे गंभीर जखमी झाल्या असल्याने त्यांना उपचारासाठी पनवेलला हलवण्यात आले. मात्र हा हल्ला का करण्यात आला याचे कारण अस्पष्ट आहे.
मुलानेच आईशी किरकोळ वादातून तिच्यावर भाजी कापण्याच्या सुरीने हल्ला केल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजते. किरकोळ वादाचे पर्यावसन रक्तरंजित घटनेत घडल्यानंतर घाबरलेल्या या मुलानेनंतर स्वत:वरही वार करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.