पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावातून एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 10 वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाकडून लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शेजारीच राहणाऱ्या एका तरुणाने साडेनऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ओळखीचा गैरफायदा घेत गावातून बाहेर नेले. त्यानंतर उसाच्या शेताजवळ तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला.
मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि स्थानिक माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पंचनाम्याचे काम पूर्ण केले आहे.
या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. तसेच गावातील सुरक्षेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली पोलीस चौकी तातडीने सुरू करावी, अशी आक्रमक मागणीही नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, तर या चिमुकलीला न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
रास्ता रोकोमुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, प्रशासनासमोर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.पिंपळवंडीतील दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून, पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.