Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी; e- kyc बाबत मंत्री आदिती तटकरेंची नवीन पोस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी; e- kyc बाबत मंत्री आदिती तटकरेंची नवीन पोस्ट

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात जवळपास दोन कोटींपेक्षा जास्त महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. या योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेसाठी काही निकष ठेवण्यात आली आहे. तसेच आता निकषांची अंमलबजावणी कठोरपणे केली जात आहे. राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या ई-केवायसीसाठी तारीखही वाढवण्यात आली होती. आता ई-केवायसीची मुदत संपली आहे. दरम्यान, याच ई-केवायसीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

मंत्री आदिती तटकरे यांची एक्स पोस्ट

महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. 

तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : Rupali Thombare Patil : ‘घड्याळाला मतदान केलं तर मत भाजपाला जातं असं नाही’, रुपाली ठोंबरे पाटील यांचं वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version