तोतया पोलीस अडकला खऱ्या पोलिसांच्या जाळ्यात; भामट्यावर 20 हून अधिक गुन्हे दाखल

तोतया पोलीस खऱ्या पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. या भामट्यावर 20 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिर्डी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. <br/><br/>
तोतया पोलीस अडकला खऱ्या पोलिसांच्या जाळ्यात; भामट्यावर 20 हून अधिक गुन्हे दाखल

शिर्डी : तोतया पोलीस खऱ्या पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. या भामट्यावर 20 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिर्डी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांना फसवणारा तोतया शिर्डी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या भामट्यावर विविध पोलीस ठाण्यात 20 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असून त्याच्याकडे अनेक खोटी ओळखपत्र देखील सापडली आहेत. 

हेही वाचा : राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन; तिरंगा रॅलीतून शौर्याला सलाम

पोलिस असल्याची बतावणी करणारा एक इसम शिर्डीतील भक्त निवास परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांना समजताच ते आपल्या पथकासह त्याठिकाणी पोहचले. पोलिस आल्याची चाहूल लागतच या भामट्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र शिर्डी पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. या 30 वर्षीय तोतया पोलिसाचे नाव जाकीर उर्फ जग्गू युसुफ खान असून तो अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील रहिवासी आहे. त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि लोणी पोलिस ठाण्यासह राज्यातील विविध पोलिस ठाण्यात 20 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे. आरोपी जाकीर खान याच्याकडे अनेक खोटी ओळखपत्र आणि विना नंबरची दुचाकी सापडली. तसेच त्याच्याकडे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक पाटील नावाने खोटे ओळखपत्रही सापडले. हा भामटा वृद्ध नागरिकांना हेरायचा आणि पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून तपासणीच्या नावाखाली त्यांच्याकडील दागिने, पैसे लंपास करायचा. शिर्डीतील भक्त निवास परिसरातील पाचशे रुमची तपासणी पोलिसांनी केवी. यावेळी शिर्डी पोलिसांनी तोतया पोलिसाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपासासाठी आरोपीला लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version