एसटी कामगार राजकारणाचे बळी ठरले तर दुर्दैव – अनिल परब

एसटी कामगार राजकारणाचे बळी ठरले तर दुर्दैव – अनिल परब

  मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची विनंती केली आहे. खोत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत म्हणणे मांडण्यात आले परंतू त्यांनी बाहेर जाऊन वेगळेच सांगितले. त्यामुळे माझी चर्चेची दारे खुली असून इतरांच्या मनात काय आहे हे माहित नाही असा अप्रत्यक्ष टोला अनिल परब यांनी भाजपवर लगावला आहे.

  कामगारांचे वेतनवाढ ही मागणी वगळता एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच विलिनीकरणाची मागणी १-२ दिवसांत शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घ्यावा लागेल. प्रवाशांची गैरसोय टाळावी. तसेच न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला बेकायदेशीर ठरवले आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन जितके तीव्र होईल त्यामुळे एसटीचेच मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. आणि एसटीचे नुकसान झाले तर कर्मचाऱ्यांचेही नुकसान होईल. त्यामुळे कामगार राजकारणाचे बळी ठरले तर दुर्दैव म्हणावे लागेल असे, परब म्हणाले.

 गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. मी आजचा पूर्ण दिवस चर्चेसाठी ठेवला आहे. मात्र यावर भाषणे ऐकली तर एसटी कर्मचाऱ्यांता संप अधिक तीव्र होईल आशी विरोधी पक्षनेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे भाजपा सरकार असताना एसटी महामंडळाचे विलिनीकरण का केले नाही? असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version