‘आरक्षण दिले तर एमआयएम निवडणूका लढणार नाही’ – इम्तियाज जलील

‘आरक्षण दिले तर एमआयएम निवडणूका लढणार नाही’ – इम्तियाज जलील

‘विधिमंडळ अधिवेशनात जर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा कायदा आणला तर राज्यात एमआयएम नगरपालिका आणि मनपा निवडणूक लढणार नाही’, अशी घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे केली आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे याप्रकरणी एमआयएमने राज्य सरकारला एक ऑफर दिली आहे. मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षणाची मागणी एमआयएमने केली आहे. विधिमंडळ अधिवेशनात आम्हाला अधिवेशन मिळाले तर एमआयएम महानगरपालिकेच्या निवडणुका लढवणार नाही अशी घोषणा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. मात्र राज्य सरकारने मुसलिमांना आरक्षण दिले नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

सरकारने आम्हाला आरक्षण द्या, आम्ही निवडणूक लढवणार नाही, मात्र आरक्षण दिले नाही तर अधिवेशनादरम्यान आम्ही विधान भवनावर आंदोलन करण्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे. त्यामुळे जलील यांच्या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version