उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी सोमवारी, २० फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर देशात यादवी माजेल”, असे वक्तव्य उद्धव गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केले आहे. “येत्या काळात हुकूमशाही सुरु होईल.” “२०२४ ची निवडणूक शेवटची निवडणूक असेल यानंतर नंगा नाच सुरु होईल.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच, “शिवसेना संपवण्यासाठी काही प्रयत्न करत आहेत”, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, शिवसेना आणि निवडणूक आयोग यांवर निशाणा साधला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.