‘मी पुन्हा आलो, शिंदेंना सोबत घेऊन आलो’

‘मी पुन्हा आलो, शिंदेंना सोबत घेऊन आलो’

राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा सोमवारी दुसरा दिवस आहे. यापूर्वी रविवारी संध्याकाळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना आमदारांच्या गटाची, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार आणि पक्षाच्या इतर नेत्यांची भेट घेतली. आणि, त्यांच्या उपस्थितीत मुंबईतील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली होती. यानंतर शिवसेनेच्या आणखी एका आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. विधानसभेत आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडली.

राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्षात शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आज विधासभेत बहुमत प्रस्ताव जिंकला. यात मतमोजणीत बहुमत शिंदे सरकारच्या बाजूने लागले आहे. १६४ पेक्षा जास्त मते शिंदे गट आणि भाजपला मिळाली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का बसला आहे. असे मानले जात आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदनाच्या प्रस्तावाचे भाषण झाले. त्या दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात भाषण केले. आणि, त्यात ते असे म्हणाले की मी पुन्हा येईन!असं म्हणालो होतो आणि मी पुन्हा आलोच आणि शिंदेंना सोबत घेऊन आलो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यानंतर पुढे फडणवीस म्हणाले कि, मविआ सरकार अनैसर्गिक आहे, ते टिकणार नाही, मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, त्यावरही माझी टिंगल उडवली, पण मी आलो, एकटा नाही आलो, एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन आलो. ज्यांनी माझी टिंकल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे, की मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते, असे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version