‘राष्ट्रवादीचा अध्यक्ष मीच’

‘राष्ट्रवादीचा अध्यक्ष मीच’

‘राष्ट्रवादीचा अध्यक्ष मीच’

मुंबई, २६ ऑगस्ट २०२३,प्रतिनिधी : सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी बद्दल अनेक संभ्रम निर्माण झाल्याची परिस्थिती पाहायला मिळते. अजित पवार यांनी बंड केल्यापासून राजकीय चर्चांना उधाण आल्याचं चित्र आहे. दरम्यान ‘राष्ट्रवादीचा अध्यक्ष मीच’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.

गेल्या २ ते ३ दिवसांपासून शरद पवार त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून चर्चेत आले आहे. अजित पवार आजही आमचे नेते आहेत, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले. शरद पवार यांनीही सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. यानंतर अवघ्या सहा तासांत पवारांनी कोलांटी उडी मारली. मी… मी असं कधी म्हणालो. असा उलटा प्रश्नच शरद पवार यांनी पत्रकारांना विचारला.

याच बरोबर ‘पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील’ आणि ‘पक्षाचं धोरण राबवण्याचा अधिकार फक्त आम्हालाच’ असं देखील शरद पवार म्हणाले आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version