उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी

उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

उत्तर कोरियाकडून रविवारी हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याचा दावा करण्यात आला. जपानने उत्तर कोरियाने सहाव्यांदा यशस्वी अणुचाचणी केल्याच्या वृत्ताला

दुजोरा दिला.

 

दरम्यान आज सकाळी अनेक प्रसारमाध्यमांनी उत्तर कोरियात 6.3 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाल्याचे वृत्त दिले. मात्र, हा भूकंप नसून अणुचाचणीचा परिणाम

असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

 

काहीवेळातच उत्तर कोरियाने अधिकृतरित्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याची माहिती दिली. या हायड्रोजन बॉम्बमध्ये अणुबॉम्बपेक्षा शंभर पट संहारक क्षमता

आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version