हिमाचलमध्ये भाजपला बहुमत

हिमाचलमध्ये भाजपला बहुमत

 वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांत भाजप बहुमतात येणार असल्‍याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकीच्‍या मतमोजणीमध्‍ये एकूण 68 जागांपैकी भाजप 44 तर काँग्रेस 21 जागांवर पुढे आहे. तर, सत्ताधारी काँग्रेस 20-21 जागांमध्येच अडखळताना दिसत आहे.

 

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचं कमळ फुललं असून. काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. पण, भाजप मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल मात्र, सुजनपूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेत. प्रेम कुमार धुमल यांचा पराभव झाल्याने हिमालचमध्ये भाजप समोर मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झालाय. कारण पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हिमाचलमध्ये प्रेम कुमार धुमल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केलं होतं.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version