”उसने घ्या, भीक मागा, पण पैसे परत कधी देणार ते सांगा” हायकोर्टानं डीएसकेंना फटकारले

”उसने घ्या, भीक मागा, पण पैसे परत कधी देणार ते सांगा” हायकोर्टानं डीएसकेंना फटकारले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

डीएसकेंच्या सततच्या कारणांना वैतागलेल्या हायकोर्टाने अखेर डीएसकेंना चक्क भीक मागण्याचा सल्ला दिलाय. पैसे उसने घ्या, भीक मागा, काहीही करा, लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहिती द्या, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना सुनावलं आहे. डीएसकेंवर एमपीआयडी अंतर्गत काय कारवाई केली जाऊ शकते, याचा तपशील सादर करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिलेत.

तसेच डीएसकेंची कधीच कस्टडी न मागितल्यानं सरकारला चांगलंच सुनावलं देखील आहे. दरम्यान, 13 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत डीएसकेंना पत्नी हेमांगीसह हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version