हसन मुश्रीफांना उच्च न्यायालयाचा दिलासा

हसन मुश्रीफांना उच्च न्यायालयाचा दिलासा

ईडीच्या रडारवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. ईडी प्रकरणी हसन मुश्रीफ यांना २७ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे २७ एप्रिलपर्यंत मुश्रीफांना अटक करता येणार नाही.

ईडीकडून आर्थिक घोटाळ्याचे आरोप करण्यात आल्यानंतर मुश्रीफांनी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने मुश्रीफांना २७ एप्रिलपर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले आहेत.

हसन मुश्रीफांवर आरोप काय?

मुंबई सत्र न्यायालयाने हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे मुश्रीफांवर अटकेची टांगती तलवार होती. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी ईडीकडे मुश्रीफांविरोधात आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार, कथित ४० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून मुश्रीफांची चौकशी सुरू आहे. तर, शेअर्सच्या रुपात मुश्रीफांनी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी १० हजार रुपये घेतले असल्याचा दावा ईडीने केला आहे. तसेच आतापर्यंत १०८ शेतकऱ्यांनी कोल्हापूर पोलीस आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली आहे. मुश्रीफांनी फसवणूक केल्याचा आरोप शेकऱ्यांनी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version