सनी देओलची अनोखी मेहंदी पाहिलीत का ?

सनी देओलची अनोखी मेहंदी पाहिलीत का ?

मुंबई, १६ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूडमध्ये सध्या लग्न सराई सुरु आहे. लवकरच अभिनेता सनी देओलच्या घरात सनई वाजणार आहे. अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल 18 जून रोजी द्रिशा आचार्यसोबत लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या करण आणि श्रेयाच्या लग्नाआधीचे वेगवेगळे कार्यक्रम जोरात सुरु आहेत.

करण देओल आणि द्रिशा आचार्य यांचा हळदी समारंभ नुकताच पार पडला. त्यानंतर आता मेहंदी समारंभाची लगबग सुरु होती. अशातच आता करण आणि द्रिशा यांच्या मेहंदी समारंभातील काही फोटो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोत नवरा नवरीच्या मेहंदीसह होणाऱ्या नवरदेवाचे वडिल म्हणजेच सनी देओलच्या मेंहदीने देखील सर्वांचे लक्ष वेधले. सनीच्या मेहंदीने सर्वांचे मन जिंकलं आहे.


व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत सनी देओल आपली मेहंदी काढताना दिसत आहे. विशेष म्हणजे हातावर मेंहदीची डिझाइन नव्हे तर प्रत्येक धर्मांची चिन्ह काढली होती. यातुन तो प्रत्येक धर्माचा किती आदर हे दर्शवण्यात आले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version