आपली परंपरा विसरली का उर्मिला ?

आपली परंपरा विसरली का उर्मिला ?

आज ईदच्या निमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडतोय. सर्वसामान्यांपासून ते मोठ्या दिग्गज लोकांपर्यंत सर्वानीच एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच काही सेलिब्रिटींना जबरदस्त ट्रोल सुद्धा केलं जातंय. त्यासाठी कारणही ही तसेच आहे. मुळात आज ईद असली तरी आज अक्षय्य तृतिया देखील आहे.आणि हा सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशातच एका विशिष्ट कारणाने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला ट्रोल केलं जात आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हि मूळ हिंदू धर्मीय आहे परंतु तिने लग्न मुस्लिम धर्मात केलं आहे..हे आता जगजाहिर आहे. असे असले तरी बऱ्याच वेळा मुसकीं धर्माचा सन्मान करता करता आपल्या मराठी परंपरेचा तिला विसर पडत चाललंय असे तिच्या चाहत्यांच्या निदर्शनास आल्याने तिचे चाहते नाराज झाले आहेत.
आताही तिने ईदच्या निमित्ताने चाहत्यांना शुभेच्छा देणारी एक पोस्ट केली आणि सोबत काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.तिच्या या पोस्टवर अनेक लोकांनी कंमेंट्स केल्या आहेत. यावर अगदी पाकिस्तानातूनही प्रतिक्रिया आल्या आहेत.

या सगळ्यात तिच्या एका मराठी भाषिक चाहतीने अस्खलित मराठीत तिला प्रश्न केला आहे. तिने या पोस्ट खाली कंमेंट्समध्ये लिहिलं की, ‘मॅडम..तुम्ही अक्षय्य तृतिया नाही का साजरी करत?’ या कंमेंट चा बऱ्याच मराठी भाषिकांनी सहमती दर्शवली आहे. यावर आता उर्मिला प्रतिक्रिया देणार का याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version