जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दोन गटांत झालेल्या हाणामारीत तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. पार्किंगच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. रियाज शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. रियाज शेख राहत असलेल्या नेतिवलीच्या श्रीकृष्णनगर भागात एक हुक्का पार्लर सुरू होते. या पार्लरच्या बाहेर मोठया प्रमाणात गाड्यांची पार्किंग होत असल्याने रियाजने याला आक्षेप घेतला होता.
यावरूनच शनिवार रात्री रियाज आणि तिथल्या वाहनचालकांमध्ये वाद झाला. त्यानंतर रियाज टिळकनगर पोलीस ठाण्यात गेला, मात्र पोलिसांनी योग्य दखल घेतली नसल्याचा रियाजच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. या सर्व प्रकरणानंतर रियाजला काही जणांनी मारहाण केली आणि गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच रियाजची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.