यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मागील दोन वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. या वर्षी शोभायात्रांना परवानगी मिळाल्याने नागरिक मोठ्या उत्साहात सणाचा आनंद घेत आहेत. यंदा गुढीपाडव्यापासूनच म्हणजेच आजपासूनच राज्यातील कोरोनासंदर्भातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. शिवाय, मास्कची सक्तीदेखील नाही. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे दादर, गिरगाव, डोंबिवली या भागात गुढी पाडव्याच्या शोभायात्रांचा उत्साह दिसून येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.