वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात आता गुगलने उडी मारली आहे. गुगलची ‘तेज’ या नावाची युनिफाइड पेमेंट इंटरफेस आधारित डिजिटल पेमेंट सेवा भारतात सुरु होणार आहे.
18 सप्टेंबर रोजी दिल्लीत गुगलच्या तेज चे लॉंचिंग होणार आहे. भारतामध्ये डिजिटल पेमेंट क्षेत्रात झपाट्याने वाढत होत आहे. त्यात आता गुगलने आपले स्थान बळकावले आहे.
‘आम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. म्हणून आम्ही भारतात आमचे नवे उत्पादन सादर करीत आहोत, तसेच ‘तेज’ हे ‘मेक इन इंडिया’ चे उत्पादन असून, ‘अँड्रॉईड पे’ प्रमाणे ते काम करणार आहे.
तेज हा हिंदी शब्द असून, त्याचा अर्थ आहे गती. गतिमान सेवेचे प्रतीक म्हणून गुगलने हे नाव निवडले’, असे कंपनीने म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.