गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी

मुंबई, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : येत्या १९ सप्टेंबर पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे. मुंबई महापालिका तसेच राज्य सरकारकडून गणेश मंडळांना नियमांमध्ये सूट देण्याची तसेच तीन ते पाच दिवस रात्री उशिरापर्यंत लाउडस्पीकरची परवानगी देण्यात येत आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशभक्तांना मोठं गिफ्ट दिलं आहे. नवी मुंबईतील सर्व गणेश मंडळांना अनामत शूल्क आणि मंडपशुल्क माफ माफ करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला केल्या आहे. त्यामुळं गणेशभक्तांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहे. मंडप शूल्क आणि अनामत रक्कम गणेश मंडळांकडून घेतली जाणार नाही. त्यामुळं गणेश मंडळांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईत मंडप तसेच अन्य परवानग्यांसाठी गणेश मंडळांकडून महापालिकेकडे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालिकेने गणेश मंडळांना परवानगी शूल्कही माफ केलं आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवस अगोदर पर्यंत म्हणजेच ९ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू राहणार असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. गणेश मंडळांकडून सध्या वेगवेगळ्या परवानग्यांसाठी प्रशासनाकडे अर्ज करण्यात येत आहे. दुसरीकडे पोलीस व सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेण्यात येत आहे. याशिवाय गणेश विसर्जनासाठी तलाव, नदी, समुद्र आणि कृतिम तलावांच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील गणेश मंडळांना मंडपशूल्क तसेच अनामत रक्कम शूल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version