Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उलाढाल, जाणून घ्या 24 कॅरेट, 22 कॅरेटचे ताजे दर

जागतिक बाजारातील घडामोडी आणि स्थानिक मागणीतील वाढ यामुळे सोन्याच्या दरात ही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय अमेरिकन डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार, आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता, महागाई आणि
Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उलाढाल, जाणून घ्या 24 कॅरेट, 22 कॅरेटचे ताजे दर

जागतिक बाजारातील घडामोडी आणि स्थानिक मागणीतील वाढ यामुळे सोन्याच्या दरात ही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय अमेरिकन डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार, आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता, महागाई आणि सणासुदीच्या काळातील वाढलेली मागणी याचाही सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे. ऐन सणासुदीत सर्वत्र जल्लोषपूर्ण वातावरण असताना  सोने-चांदीचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे सततच्या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांना मोठा फटका बसतोय. आज शनिवार, 19 सप्टेंबर 2026 रोजी भारतीय सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे.

आजचे सोन्याचे ताजे दर काय आहेत?
बुलियन मार्केटनुसार आजचे दर असे आहेत:
24 कॅरेट सोने (10 ग्रॅम): 1,54,940 रुपये
22 कॅरेट सोने (10 ग्रॅम):1,42,028 रुपये
चांदी (1 किलो): 2,49,900 रुपये
चांदी (10 ग्रॅम): 2,499 रुपये

चांदीच्या दराने मारली उसळी 
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदीचा सरासरी भाव सध्या 2,50,100 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. दरम्यान, वायदा बाजारात चांदीच्या दरातही तेजी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) डिसेंबर डिलिव्हरीचा चांदीच्या करारात 1.25 टक्क्यांची वाढ झाली. चांदीचा भाव 2,41,183 रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचला. या व्यवहारात 3,082 लॉटसची उलाढाल झाली. मिळालेल्या माहितीनुसार, बाजार विश्लेषकांच्या मते देशांतर्गत बाजारात चांदीची मागणी मजबूत असल्याने व्यापाऱ्यांकडून नव्या सौद्यांची खरेदी करण्यात आली. त्यामुळे चांदीच्या वायदा दरांना आधार मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या दरात वाढ झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये चांदीचा भाव 2.39 टक्क्यांनी वाढून 66.78 डॉलर प्रति औंस झाला.

हेही वाचा – UPI Transactions Rule : यूपीआयवर टॅक्स? तुम्ही जे समजत आहात तसं खरंच घडणार आहे का?

तुमच्या शहरांतील आजचा सोन्याचा भाव

मुंबई –
22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 141,772 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत 154,660 प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे –
प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 141,772 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर 154,660 रुपये आहे.

नागपूर –
प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 141,772 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर 154,660 रुपये इतका आहे.

नाशिक –
प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 141,772 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर 154,660 रुपये आहे.

त्यामुळे जर आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदीपूर्वी स्थानिक सराफा दुकानातील ताजे दर आणि मजुरी (Making Charges) नक्की तपासून घ्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version