जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात 12 हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी आगामी काळात दर कोणत्या दिशेने जातील, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
जळगावच्या बाजारात सोन्या-चांदीच्या दरात आठवड्याभरात मोठी घसरण झाली असून सोन्याच्या दरात दहा हजार रुपयाची तर चांदीच्या दरात बारा हजार रुपयाची घसरण झाली आहे. यात भारतातील इनपुट ड्युटी संदर्भात अनिश्चितता असल्याचे समोर आले आहे. जॅक्सन होल बैठकीनंतर गुंतवणूकदारांनी फेडच्या पुढील व्याजदर धोरणाचा नव्याने अंदाज घेण्यात सुरुवात केली आहे, त्यामुळे सोन्यात प्रॉफिट बुकिंग वाढली आहे.
डॉलर index वधारला आहे. सोन्याच्या इनपुट ड्युटी बाबत अनिश्चितता आहे. सोने-चांदीच्या दरात घसरण होण्यामागची ही प्रमुख कारणे समोर येत आहे. मागच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी करू नका असे आवाहन केल्यानंतर ग्राहकांनी जूने सोन देऊन नवीन सोन घेतले आहे.
आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 59 हजार 650 तर चांदीचे दर जीएसटी सह 2 लाख 47 हजार 200 रुपये आहेत आगामी काळात सोने चांदीच्या भाव वाढीमध्ये अनिश्चितता दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, मागणी-पुरवठा आणि आर्थिक परिस्थितीचा परिणाम मौल्यवान धातूंच्या दरावर होत असल्याने पुढील काळात सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.