दूध महागलं, किती रुपयांनी ते पाहा…

दूध महागलं, किती रुपयांनी ते पाहा…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नागपूर पावसाळी अधिवेशनात 21 जुलै पासून अंमलबजवणीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र खाजगी तसंच शासनाच्या दूध सहकारी संस्थानीं अंमलबजावणीसाठी तांत्रिक कारणामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.

आज दुग्धविकास विभाग आणि संबंधितांची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, उद्यापासून म्हणजेच एक ऑगस्टपासून अंमलबजवणीला सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले. गोकुळने दुधाचे दर वाढविल्याने त्याचा मुंबईतील ग्राहकांनाही फटका बसणार आहे. मात्र, म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

दुधाच्या खरेदीचा दर प्रतिलिटर २५ रुपयांनी जाहीर करुन राज्य सरकारने आंदोलनाची कोंडी फोडली अन् उत्पादकांना दिलासा दिला होता. 

  • गोकुळचे दूध दोन रुपयांनी महागले
  • म्हैशीचे दूध 56 रुपये लिटर मिळणार
  • तर गायीचे 45 रुपये लिटर मिळणार
  • खरेदी दारात दोन रुपये वाढ केल्यानंतर विक्रीतही केली वाढ
  • उद्यापासून नवीन दरवाढ लागू

राज्यात 4 दिवसांच्या दुधबंद आंदोलनानंतर दूध उत्पादकांना लिटरमागे किमान 25 रुपये भाव तसेच 5 रुपये रुपांतरीत अनुदान देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी म्हटंले आहे. गुरुवारी सरकारतर्फे दुध दराबाबत मह्त्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या.

राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत – राजू शेट्टी

गोकुळ दूध दरावरून राजकारण पेटलं

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version