मनोहर पर्रिकरांची प्रकृती आणखी बिघडली, एम्समध्ये हलवणार

मनोहर पर्रिकरांची प्रकृती आणखी बिघडली, एम्समध्ये हलवणार

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

यासाठी गोव्याहून एका विशेष विमानानं ते दिल्लीला रवाना होणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कलंगुट येथील खासगी रुग्णालयात मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार सुरु होते.

त्यानंतर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी काल घरी परतले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं पुन्हा आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version