‘तिने’ कट रचला अन् त्याला संपवले

‘तिने’ कट रचला अन् त्याला संपवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

प्रेयसी आपल्या प्रियकराचा कट रचून खून करते, असे अनेक चित्रपट आपण पाहिले असतील. अशीच प्रत्यक्ष घटना ठाण्यात घडलीय. मॉर्निंग वॉकला गेलेल्या रामजी शर्माचा अपघात झाला आणि उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झालाय. मात्र, हा अपघात नसून घातपात होता असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

 

प्रेयसी सुमारी यादवच्या सांगण्यावरून रामजीविरोधात कट रचण्यात आला होता. यामध्ये सुमारीचा प्रियकर जयप्रकाश चौहान सामील होता. दरम्यान, आरोपी सुमारी आणि तिच्या मदतीला असलेला तिचा साथीदार जयप्रकाश चौहान याला पोलिसांनी अटक केलीय. विशेष म्हणजे, सुमारी हिचे जयप्रकाशसोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. रामजी हा सुमारीला त्रास देत असल्यानं रामजीला अपघात घडवून धडा शिकवण्याचा कट असल्याचं आरोपींकडून सांगण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version