Ganesh Chaturthi 2026: गणपतीला ‘प्रथम पूज्य’ का म्हणतात? यामागचे खरे कारण काय?

Ganesh Chaturthi 2026: गणपतीला ‘प्रथम पूज्य’ का म्हणतात? यामागचे खरे कारण काय?

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेने केली जाते. मग ते गृहप्रवेश असो, लग्नकार्य असो वा नवीन व्यवसाय असो, प्रत्येक पूजेत त्यांना प्रथम मान दिला जातो. कारण बाप्पाला विघ्नहर्ता म्हटले जाते, त्यांच्या पूजेने सर्व अडथळे दूर होतात. तसेच ते बुद्धी, ज्ञान आणि विवेकाचे प्रतीक मानले जातात, त्यामुळे त्यांच्या पूजेने सुरू केलेले प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होते, अशी मान्यता आहे.

पौराणिक कथेनुसार, एकदा सर्व देवांमध्ये प्रथम पूजा कोणाची करावी यावरून वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी भगवान शंकरांनी एक स्पर्धा आयोजित केली. जो कोणी सर्वात आधी संपूर्ण विश्वाची प्रदक्षिणा पूर्ण करेल, त्याचीच प्रथम पूजा केली जाईल, असे ठरले. त्यानंतर सर्व देव आपापल्या वाहनांवर बसून प्रदक्षिणेसाठी निघाले.

हेही वाचा – Ganeshotsav 2026: श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाच्या आरतीचा मान सर्वसामान्यांना! जाणून घ्या सविस्तर माहिती.. 

तर इकडे बुद्धीची देवता असलेल्या गणेशाने आपल्या आई-वडिलांची म्हणजेच देवी पार्वती आणि भगवान शिवशंकरांची प्रदक्षिणा केली आणि घोषित केले की, माझ्यासाठी माझे आई-वडीलच माझे संपूर्ण विश्व आहेत. गणेशाची ही बुद्धी आणि भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी गणेशाला प्रथम पूजेचा मान देण्याचे वरदान दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version