Gadchiroli Snakebite Incident: समृद्धीच्या प्रकृतीत सुधारणा! गडचिरोली आश्रमशाळेतील सर्पदंशानंतर नागपुरात उपचार, डॉक्टरांच्या प्रयत्नांना अखेर यश

गडचिरोलीच्या जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेत गंभीर झालेल्या समृद्धी नैतामची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. नागपुरात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे
Gadchiroli Snakebite Incident: समृद्धीच्या प्रकृतीत सुधारणा! गडचिरोली आश्रमशाळेतील सर्पदंशानंतर नागपुरात उपचार, डॉक्टरांच्या प्रयत्नांना अखेर यश

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाच्या घटनेने काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती. रात्रीच्या वेळी सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्यानंतर त्यापैकी तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर गंभीर अवस्थेतील एका विद्यार्थिनीला तातडीने नागपूर येथे हलवण्यात आले होते. आता तिच्या प्रकृतीबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. समृद्धी सुरेश नैताम या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला अधिक चांगल्या वैद्यकीय उपचारांसाठी गडचिरोलीहून हेलिकॉप्टरच्या मदतीने नागपूर येथे हलवण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलिसांच्या समन्वयातून हे वैद्यकीय स्थलांतर करण्यात आले होते.

नागपूर येथे उपचार सुरू झाल्यानंतर समृद्धीच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत असून, या वृत्तामुळे कुटुंबीयांसह प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनी जेवण करून झोपल्यानंतर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. सर्पदंश झाल्यानंतर सर्व बाधित विद्यार्थिनींना सुरुवातीला धानोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर गंभीर रुग्णांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

या घटनेत दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी या तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर विद्यार्थिनींवर उपचार करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version