Gadchiroli ST Bus: गडचिरोलीत धावत्या एसटी बसचा थरार! अचानक चाक निखळलं, 28 प्रवाशांचा जीव…

गडचिरोलीतील अहेरी-सिरोंचा मार्गावर धावत्या एसटी बसचे मागील चाक अचानक निखळून शेतात पडले. बसमधील सुमारे 28 प्रवासी सुखरूप बचावले असून एसटीच्या देखभालीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Gadchiroli ST Bus: गडचिरोलीत धावत्या एसटी बसचा थरार! अचानक चाक निखळलं, 28 प्रवाशांचा जीव…

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी-सिरोंचा मार्गावर धावत्या एसटी बसचे मागील चाक अचानक निखळल्याची धक्कादायक घटना घडली. मेढारामजवळ ही घटना घडली असून, सुदैवाने बसमधील सुमारे 28 प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे एसटी बसच्या देखभाल आणि सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अहेरीहून सिरोंचाच्या दिशेने बस प्रवास करत असताना अचानक बसच्या मागील बाजूचे चाक निखळले. हे चाक रस्त्यालगत असलेल्या शेतात जाऊन पडले. चाक निखळल्याने बसमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत बस सुरक्षितपणे थांबवली आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेत बसमधील सुमारे 28 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. सुदैवाने बस उलटली नाही किंवा अन्य वाहनाला धडक झाली नाही. गडचिरोली जिल्ह्यात एसटी बसच्या अवस्थेबाबत यापूर्वीही तक्रारी आणि घटना समोर आल्या आहेत. काही बसमध्ये पावसाचे पाणी गळणे, तर धावत्या बसच्या छताशी संबंधित घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version