इंधन दरवाढ सुरुच आहे. पेट्रोल 18 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागलं आहे.
25 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची ही दरवाढ सुरुच आहे. महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरड मोडलं असताना, दिलासा तरी कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
मुंबईबरोबरच राजधानी दिल्लीतही पेट्रोलचा दर 22 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर 83.40 रुपये इतका झाला आहे. तर डिझेलच्या दरात 21 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रतिलिटर डिझेलसाठी दिल्लीकरांना 74.63 रुपये मोजावे लागणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.