कृषी पंपाच्या बिलाने हैराण शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

कृषी पंपाच्या बिलाने हैराण शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर

महावितरणाच्या त्रासाला कंटाळून लातूरच्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्याने थेट एमएसईबीच्या कार्यालयात जाऊन विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय.

शहाजी धीरु राठोड असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. शहाजी यांना कृषी पंपाचे 59 हजार 400 रुपयांचे बिल आले होते. या तणावाखाली शहाजी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, अजितदादा पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, सतीश चव्हाण, विक्रम काळेंनी रुग्णालयात या शेतकऱ्याची भेट घेतली. तसेच, शहाजी यांना 1 लाखांची मदत देखील केली.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version