Hingoli Accident : हिंगोलीत मन हेलावणारी दुर्घटना! रिक्षा अन् पिकअपची भीषण धडक; चार जणं दगावले, एक गंभीर जखमी

हिंगोली जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Hingoli Accident : हिंगोलीत मन हेलावणारी दुर्घटना! रिक्षा अन् पिकअपची भीषण धडक; चार जणं दगावले, एक गंभीर जखमी

हिंगोली जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील परभणी रोडवर ऑटो रिक्षा आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. हिंगोली-परभणी रोडवरील गुंडा पाटीवर 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून पिकअपने ऑटोला धडक दिल्याने ऑटो थेट रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन कोसळला.

हेही वाचा- Crime News : क्राइम थ्रिलर सिनेमालाही मागे टाकेल अशी क्रूरता! पत्नीचं डोकं फ्रीजमध्ये, मृतदेहाशेजारीच जेवण; सहा महिन्यांपूर्वीच्या लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट

या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेद्वारे सहा जणांना उपचारासाठी परभणी येथे दाखल केले. दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की, यात आईसह दोन लहान मुलांचा आणि एका बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

या शिवाय घटनास्थळावर दोन बालकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी तीन वर्षाची मुलगी व एक बारा वर्षाचा मुलगा आहे. दोघांचेही मृतदेह हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहेत. मन हेलवाणाऱ्या या भीषण दुर्घटनेनं स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version