माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सायबर क्राईमचा बळी

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सायबर क्राईमचा बळी

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सायबर क्राईमचा बळी ठरला आहे. विनोद कांबळी यांच्या बॅंक खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले. मोबाईलवर मॅसेज येताच कांबळी यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यामुळे याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बँक अधिकारी म्हणून एका व्यक्तीने विनोद कांबळी यांना फोन केला  होता. त्यानंतर त्याने कांबळी यांना लिंक पाठवली. कांबळी यांना लिंक पाठवल्यानंतर काही वेळाने त्याच्या खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले. खात्यातून पैसे काढण्याचा मॅसेज कांबळी यांच्या मोबाईलवर आला. त्यावेळी त्यांची फसवणूक झाली असल्याचे त्यांना लक्षात आले असून वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version