लग्नसोहळ्यात बासुंदी खाणे या वऱ्हाडींच्या जीवावर बेतले

लग्नसोहळ्यात बासुंदी खाणे या वऱ्हाडींच्या जीवावर बेतले

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

पिंपरीमध्ये लग्नसोहळ्यात जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

लग्नसोहळ्यात सामील झालेल्या 14 जणांना भोजनाच्यावेळी बासुंदी खाल्यानंतर विषबाधा झालीये.

यात 4 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडच्या रावेतमध्ये हा लग्नसोहळा होता.

या लग्नात बासुंदी खाल्ल्यानंतर या सर्वांना उलटी, जुलाब, डोकेदुखी आणि चक्करचा त्रास सुरू झाला. तात्काळ  त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version