Gadchiroli Snake Bite : "आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा" गडचिरोली सर्पदंश प्रकरणात संबंधित आश्रमशाळेवर कठोर कारवाईचे आदेश

गडचिरोलीतील सर्पदंशाच्या घटनेनंतर गडचिरोली जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनीना सर्पदंश घटनेचा चौकशी रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
Gadchiroli Snake Bite : "आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा" गडचिरोली सर्पदंश प्रकरणात संबंधित आश्रमशाळेवर कठोर कारवाईचे आदेश

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील निवासी आश्रमशाळेत घडलेल्या सर्पदंशाच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. रात्री झोपलेल्या विद्यार्थ्यांना सर्पदंश झाल्यानंतर तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गडचिरोली जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनीना सर्पदंश घटनेचा चौकशी रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.

दरम्यान सर्पदंशाच्या घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल आज सरकारला सादर केला जाणार आहे. तर घटनेच्या वेळेस मुख्याध्यापक आणि अधिक्षक अनुदानित आश्रमशाळेत हजर नव्हते. तसेच विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी बेडची आवश्यकता असताना, संस्थाचालकानी बेड पुरवले नव्हते. त्यामुळे संस्थाचालक यांच्यावरंही कारवाई होणार असल्याचे देखील समोर आले आहे. नागपूर विभागातील खाजगी अनुदानित 80 टक्के शाळांमध्ये बेड नाही, मुलं खाली झोपतात. या अनुदानित आश्रमळांनाही नोटीस बजावण्यात येणार, शाळेची मान्यता रद्द करण्याचाही इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 

Baramati Crime: ‘अथर्व मला शरीरसंबंध ठेवण्यासाठी गोळी देणार आहे’; आईला शेवटचा फोन, प्रियकरासोबत गेली अन् परतलीच नाही

या घटनेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आश्रमशाळेची ज्या अधिकाऱ्याने तपासणी केली त्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी फडणवीस म्हणाले की, शिक्षक नाही, वॉर्डन नाही शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा देत नाही. या आश्रमशाळेची ज्या अधिकाऱ्याने तपासणी केली आणि अहवाल दिला, त्याला निलंबित करा. रस्त्यावरच्या आश्रमशाळांची केवळ पाहणी करू नका, अंतर्गत भागातील आश्रमशाळांची सुद्धा नियमित तपासणी करा. आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा. मुख्य सचिवांनी एक बैठक घेऊन सर्वकष तपासणीची यंत्रणा उभी करा. सर्व विभागांना त्यात समाविष्ट करा. असा थेट आदेश फडणवीसांनी दिला आहे. 

आज अधिक्षक आणि मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. अशी माहिती अप्पर आदिवासी विकास आयुक्त आयुषी सिंह यांनी दिली. तर काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांच्यासारखे 3 वेळा आमदार, एकदा खासदार राहिलेले नेते आश्रमशाळा असे चालवत असतील आणि लहान मुलींच्या सुरक्षेशी खेळत असतील, तर ते कसे माफ करणार अशी संतप्त भूमिका आदिवासी मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version