लालूंच्या चारा घोटाळ्याचा आज फैसला; बिहारसह देशाचे लक्ष निकालाकडे

लालूंच्या चारा घोटाळ्याचा आज फैसला; बिहारसह  देशाचे लक्ष निकालाकडे

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांवर आज रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात निर्णय सुनावला जाणार आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्याशी हा घाटोळा संबंधित असल्याने रांची कोर्टाच्या निर्णयाकडे बिहारसह अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. लालूप्रसाद यादव हे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह रांचीत पोहोचले आहेत. चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना तुरुंगवास भोगावा लागतोय की जामीन मिळतोय, हे आज ठरणार आहे.

 

चारा घोटाळ्याला 1990 साली सुरुवात झाली होती. त्यावेळी लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. बिहारच्या पशूपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली गेली. यात अधिकारी, कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचाही हात होता. या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर एकूण सहा खटले सुरु आहेत. खटल्यात लालूप्रसाद यादव यांना 2013 साली पाच वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, जामिनावर ते बाहेर आहेत.

 

देवघर तिजोरीतून अवैधरित्या 90 लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात आज निर्णय सुनावला जाणार आहे. लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा यांच्यासह एकूण 22 आरोपी या प्रकरणात आहेत. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे आज अंतिम निकालाची अपेक्षा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version