बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने बहुतेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अनेक भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत. आता अक्षय एका नव्या रूपात ‘केसरी’ या चित्रपटात दिसणार आहे.
केसरी या चित्रपटांचा पहिला पोस्टर करन जोहरने व्टिटरवर पोस्ट केला. या पोस्टरमध्ये अक्षय कुमार एका शिखच्या पोशाखात दिसत आहे. विरोधकांचा सामना करण्यास अक्षयसह इतर शीख बांधवदेखील दिसून येत आहे.
Today we remember the heroes! Circa 1897. 21 SIKHS VS 10000 AFGHANS. THE BRAVEST BATTLE EVER FOUGHT!!! #KESARI …#SaragarhiDay
@akshaykumar @ParineetiChopra @apoorvamehta18 @SinghAnurag79 @iAmAzure @SunirKheterpal #CapeOfGoodFilms @@ZeeStudios_ pic.twitter.com/EaXwGRU4mC — Karan Johar (@karanjohar) September 12, 2018
या चित्रपटाची कथा 1897 मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मी आणि अफगाण-पश्तो मिलिट्री यांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारलेली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 21 मार्च 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे. करनने सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा लूक बघून प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.