पाटण तालुक्यातील मोरणा भागात गोळीबार

पाटण तालुक्यातील मोरणा भागात गोळीबार

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधील मोरणा गावात रविवारी गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पाटण तालुक्यातील मोरणा भागात गोळीबार झाल्याने २ जण ठार तर १ गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. मोरणा गावात गोळीबार होताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पाटण पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात संशयित मदन कदम यांना ताब्यात घेतला आहे. संशयित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात आहे. मदन कदम यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा एक फोटोही समोर आला आहे. रविवारी रात्री झालेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबार नेमका कोणी केला, कशासाठी केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version